Thursday, July 22, 2010

.... अजूनही .........

            आपल्या life मध्ये बरेच लोक येतात आणि जातातही, पण त्यातले काही लोक गेल्यावरही त्यांच्या मागे मनातली त्यांची जागा .... तो कोपरा ... मोकळा ठेऊन जातात ...जिथे त्यांच्या शिवाय कोणी दुसरा राहू शकत नाही ... तिथे शेवटपर्यंत राहतात त्या त्यांच्या आठवणी .... आणि एक वेडी आशा ... इच्छा ... त्यांची परत येण्याची .....
           अशाच एका मित्राने त्याच्या गेलेल्या मित्रा साठी लिहिलेली एक छोटीशी कविता ....




         ..... अजूनही ....

मला अजूनही असं वाटतं ...
तू जूनं  सगळ विसरून तू पुन्हा माझ्याशी बोलणार ...
आपली पुन्हा पहिल्या सारखी, 
घट्ट मैत्री होणार ...  

मी तुला चिडवनार,
तू नेहमी सारखच खोटं खोटं रागावनार ...
मग थोडसं हसून तू,
तुझा राग शांत झाल्याचं दाखवणार ....

मी कधी Tension मध्ये असताना ...
तुझा एखादा sms येणार ....
नकळतच माझ्या चेहर्या वर Smile देऊन ...
माझं Tension विसरवनार ....

आपण कधीतरी Movie चा plan करणार ...
पाहिजे ती Movie "House Full" म्हणून...
मी दूसरी चे Tickets काढणार ...
The End नंतर ती पकाऊ होती म्हणून तू मला ओरडत राहणार ...

कधी मला रडताना पाहून...
तुझं मन गहिवरून येइल, 
माझ्या पाठीवरून हात फिरवत ...
तू माझे डोळ्यातले अश्रु टिपशील ...

रस्त्याने चालता चालता ...
मी तुझ्या Call ची वाट पाहत असतो...
खरं सांगतो मित्रा .. तुझ्या आवाजातला ...
तू मला म्हटलेला Hello मला ऐकवासा वाटतो ...

कसं ना!! पटकन तू ...
मला तुझ्या लाइफ मधून काढून टाकलस,
पण तुला माझ्या लाइफ मधून काढून टाकायला ...
मला अजुन का नाही जमलं ...

तू परत येणार नाही ...
हे मला देखिल माहिती आहे ...
पण माझं मन माझं ऐकतच नाही...
तुझी वाट पाहणं थांबवतच नाही ...

मला वाटतं .... मी दिसल्यावर....
तू मागे वळून पाहशील ...
वळून पाहण्या एवढी  तरी जाणीव ...
तू आपल्या मैत्रि ची ठेवशील .... 


No comments:

Post a Comment