Saturday, July 3, 2010

..... कोणीतरी एकटा .....

 ..... कोणीतरी एकटा .....


जीवन पाण्याशिवाय,

पाणी पावसाशिवाय,

पाऊस सूर्याशिवाय,

सूर्य आकाशगंगेशिवाय,

आकाशगंगा पृथ्वीशिवाय,

पृथ्वी लोकांशिवाय,

लोक जात-धर्मांशिवाय,

जात धर्म मंदिरांशिवाय,

मंदिर देवान्शिवाय,

देव भाक्तांशिवाय,

भक्त हारांशिवाय,

हार फुलांशिवाय,

फूल सुगंधाशिवाय,

सुगंध वार्याशिवाय,

वारा झाडांशिवाय,

झाड निसर्गाशिवाय,

निसर्ग प्रेमाशिवाय,

प्रेम त्यागाशिवाय,

त्याग हृदयाशिवाय,

हृदय आपल्या माणसांशिवाय,

आपली माणसे नात्यांशिवाय,

नाती लग्नाशिवाय,

लग्न आवडीशिवाय,

आवड ओळखीशिवाय,

ओळख नावाशिवाय,

नाव कोणातरी शिवाय

आणि...

कोणीतरी तुझ्याशिवाय ..... 

एकटा आहे ......

No comments:

Post a Comment