Showing posts with label पाउस. Show all posts
Showing posts with label पाउस. Show all posts

Wednesday, June 15, 2011

...... पावसात ती .....

...... पावसात ती .....



पाण्याने भिजलेली ...
थंडी ने शहारलेली ...
विजांच्या कडकडाटाने घाबरलेली ...
पावसाच्या थेंबांनी नटलेली ...
ओलाव्याने सजलेली ...
छत्रीत लपलेली ...
चिखलावर थोडीशी रागावलेली ...
पण वार्याने सुखावलेली ...
दगडा दगडावर पाय टाकत चाललेली ...
स्वतः ची स्वतःच सावरलेली ...
खोटी खोटी रुसलेली ...
थोडीशी लाजलेली ...
माझ्याशी हसलेली ...
जोराच्या पावसात ....
काळ्या ढगांच्या काळोखात ... 
छत्र्यांच्या गर्दीत ....
खरंच ती ... 
ती फार .... सुंदर दिसत होती ...