Sunday, October 17, 2010

.... आज पुन्हा ....



आज पुन्हा मला तुझी आठवण झाली,
आज पुन्हा मनात... त्या जुन्या क्षणांची साठवण झाली...

आज पुन्हा मी काहीतरी विसरलो,
आज पुन्हा मी तुझ्या विचारांत हरवलो...

आज पुन्हा तुला भेटावसं वाटलं,
आज पुन्हा तुझ्या बरोबर बोलावसं वाटलं...

आज पुन्हा चुकल्यासारखा मला जाणवलं,
आज पुन्हा माझं मन दुखावाल्यासारखं काहीसं घडलं...

आज पुन्हा in-box मधले तुझे mails वाचले,
आज पुन्हा तुझ्या calls ची वाट पाहिली...

आज पुन्हा मित्रां मध्ये मी एकटाच राहिलो,
आज पुन्हा मी एकट्यातच रडलो...

आज पुन्हा तू मला समजून न घेतल्याचा मला वाईट वाटलं,
आज पुन्हा कोणीच सोबती नसल्यासारखं मला वाटलं...

आज पुन्हा दिवसभारात काही नवीन नाही घडलं,
आज पुन्हा मी दिवसाला काल सारखंच संपवलं ....   

“आपण कोणाचा मुलगा व्हावं हे आपल्या हातात नसतं “…

“आपण कोणाचा मुलगा व्हावं हे आपल्या हातात नसतं “…


“आपण कोणा famous personality चा मुलगा व्हावं हे आपल्या हातात नसतं … पण आपला बाप किती famous व्हावा हे आपल्याच हातात असतं” ….
 
खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही …  म्हणजे आपण नेहमीच बोलत असतो की, ” जर माझा बाप कोणी श्रीमंत माणूस असतं तर असं झाला असतं … मी असं केलं असतं …. कोणी भरपूर famous व्यक्ती असता तर … तर मी ही लवकर famous झालो असतो” … पण आपण असं का म्हणतो असा विचार आपण कधीच नाही करत …. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास स्वामी हे कधी असा कोणाला म्हटले असतील? कधी असा विचार शिवाजींनी केला असेल??? टिळकांनी, गांधीजीनी, स्वामी विवेकानंद, अ.पा.ज. अब्दुल कलामांनी केला असेल? Einstein, Bill Gates , Sir Richard Branson यांनी तरी कधी केला असेल? अजून किती तरी आहेत असे famous व्यक्ती जे नाही थांबले, जे नाही रडले …. की कोण आपला बाप आहे … कुठे कुठे आपल्या बापाची ओळख आहे … अजून बरंच काही ….. त्यांनी स्वताचा नाव कमवलं…. त्यांनी स्वताच इतिहास घडवला…. स्वतः मेहनत घेतली ….

मग!! आपणच का असा विचार करत असतो नेहमी …. आपल्याला का सगळ्या गोष्टी अगदी सोप्या पाहिजे असतात? आपणही का तयार नसतो त्यांच्या सारखी मेहनत घ्यायला … माझ्या मते तरी एवढंच कारण असेल की आपण घाबरतो ….. कशाला? … कोणाला? ….. आपण घाबरतो ….. आपण घाबरतो मेहनत घ्यायला… आपण घाबरतो कष्ट करायला… आपण घाबरतो स्वताला …. आणि अजून म्हणजे स्वतापेक्षा जास्त आपण घाबरतो “बाकीच्यांना.... लोकांना” … मी जर हरलो तर?? काय म्हणतील सगळे?? माझ्यावर हसतील …. मला चिडवतील …

आपल्या ला जगायचं आहे ते कोणासाठी?? … त्या लोकांसाठी?? … की … आपल्या साठी आत्ता पर्यंत आपल्या साठी जगलेल्या …  आपल्या घरातल्या लोकांसाठी  … स्वतासाठी … आपण तेच पहिलं ठरवायला पाहिजे ….

 

Sunday, October 10, 2010

.... बे चा पाढा ... ( rap 2 Angry young man type :D )




बे एके बे,
बे दुने चार,
अपुन को तेरेको बोलणे का है ....
I love you यार ...

बे त्रिक सहा,
बे चौक आठ,
हो म्हण नाहीतर ....
मी लावून टाकेन वाट ....

बे पंचे दहा,
बे सक बारा,
माझ्यासारखा dashing hero ...
तुला भेटणार नाही दुसरा ....

बे साती चौदा,
बे आठी सोळा,
famous आहे area मध्ये ...
आहे मी पोरगा साधा भोळा ...

बे नवे अठरा,
बे दाहे वीस,
कोणी दुसरा असेल तर नाव सांग ...
त्याचे करतो cut piece ....



.... बे चा पाढा ( rap )...



बे एके बे ,
बे दुने चार ...
वेडा झालो मी ...
जेव्हा पाहिलं तुला यार ....

बे त्रिक सहा ,
बे चोक आठ ,
रात्रं दिवस करत राहतो तुझाच विचार ...
मला वाटतं आता लागली माझी वाट ... 

बे पंचे दहा ,
बे सक बारा ,
प्रेमाबिमाचा लफडा ...
वाटतो मला हा सारा ....

बे साती चौदा ,
बे आठी सोळा ,
फसवणार नाही तुला कधीच...
आहे मी साधा भोळा ... 

बे नवे अठरा,
हो म्हण मला ...
माझा करू नको बकरा ...

नाही म्हणशील मला तर ...
नंतर करत राहशील मला miss ...
आहे बे दाहे वीस ....



..... राहिलं नाही ....




भरपूर मोठ्या रस्त्या वरून चाललोय ...
सोबती मात्र कोणी नाही ....

कुठेतरी शेवट असेल म्हणून चाललोय ....
पायांत ताकात मात्र अजिबात राहिली नाही ....

आयुष्य बाकी आहे म्हणून जगतोय ....
जगायची इच्छा मात्र राहिली नाही ....

मित्र आहेत .... बरेच आहेत ...
मैत्री मात्र राहिली नाही ....

प्रेमात पडलोय म्हणून प्रेम आहे ....
प्रेमावर विश्वास मात्र राहिलेला नाही ...

नाती आहेत म्हणून नातेवाईक आहेत ...
नात्यांतले संबंध मात्र राहिले नाही ....

घड्यालाहे म्हणून time आहे ....
वेळ मात्र कोणाकडेच राहिला नाही ... 

मंदिर आहे म्हणून देव आहे ....
देवावर विश्वास मात्र राहिलेला नाही ....

दोन पायांवर चालतो म्हणून माणूस आहे ...
माणुसकी मात्र राहिलेली नाही....