“आपण कोणाचा मुलगा व्हावं हे आपल्या हातात नसतं “…
“आपण कोणा famous personality चा मुलगा व्हावं हे आपल्या हातात नसतं … पण आपला बाप किती famous व्हावा हे आपल्याच हातात असतं” ….
खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही … म्हणजे आपण नेहमीच बोलत असतो की, ” जर माझा बाप कोणी श्रीमंत माणूस असतं तर असं झाला असतं … मी असं केलं असतं …. कोणी भरपूर famous व्यक्ती असता तर … तर मी ही लवकर famous झालो असतो” … पण आपण असं का म्हणतो असा विचार आपण कधीच नाही करत …. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास स्वामी हे कधी असा कोणाला म्हटले असतील? कधी असा विचार शिवाजींनी केला असेल??? टिळकांनी, गांधीजीनी, स्वामी विवेकानंद, अ.पा.ज. अब्दुल कलामांनी केला असेल? Einstein, Bill Gates , Sir Richard Branson यांनी तरी कधी केला असेल? अजून किती तरी आहेत असे famous व्यक्ती जे नाही थांबले, जे नाही रडले …. की कोण आपला बाप आहे … कुठे कुठे आपल्या बापाची ओळख आहे … अजून बरंच काही ….. त्यांनी स्वताचा नाव कमवलं…. त्यांनी स्वताच इतिहास घडवला…. स्वतः मेहनत घेतली ….
मग!! आपणच का असा विचार करत असतो नेहमी …. आपल्याला का सगळ्या गोष्टी अगदी सोप्या पाहिजे असतात? आपणही का तयार नसतो त्यांच्या सारखी मेहनत घ्यायला … माझ्या मते तरी एवढंच कारण असेल की आपण घाबरतो ….. कशाला? … कोणाला? ….. आपण घाबरतो ….. आपण घाबरतो मेहनत घ्यायला… आपण घाबरतो कष्ट करायला… आपण घाबरतो स्वताला …. आणि अजून म्हणजे स्वतापेक्षा जास्त आपण घाबरतो “बाकीच्यांना.... लोकांना” … मी जर हरलो तर?? काय म्हणतील सगळे?? माझ्यावर हसतील …. मला चिडवतील …
आपल्या ला जगायचं आहे ते कोणासाठी?? … त्या लोकांसाठी?? … की … आपल्या साठी आत्ता पर्यंत आपल्या साठी जगलेल्या … आपल्या घरातल्या लोकांसाठी … स्वतासाठी … आपण तेच पहिलं ठरवायला पाहिजे ….
No comments:
Post a Comment