Tuesday, April 14, 2009

... मुम्बैकरांचं " Spirit " .....

 ... मुम्बैकरांचं " Spirit " .....



आता पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....
Terrorists
नि पूर्ण ताकतीने हल्ला केला ,
मुंबई ला पुन्हा Target केलं ,
News Channels
वाल्यानी सगळं Cover केलं ,
प्रत्येक footage मागे हे " Exclusive " आमचेच म्हणुन भांडन केलं ,
दाखवायला Permission नाही सांगत सगळं दाखवलं ,
मृत आत्म्यांना शान्ति देतानाच्या Ads चे Cost वाढवलं ,
पण पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता
पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....


अशातच मोठ मोठ्या नेत्यांची मुंबई यायची Race चालु झाली ,
घटना स॒थळांना, Hospitals ना आणि शाहिदान्च्या घरांना भेट झाली ,
मृत आणि शाहिदान्साठी दुख व्यक्त करताना मोठया मोठ्या Amounts ची घोषणा झाली ,
पण
पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता
पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....


आताच्याया mobile युगात sms ची देखिल भर पडली ,
कोणी मराठी माणूस कुठे आहे असा विचारलं ,
तर कोणी Yes साथी 'Y' आणि No साथी 'N' Type करायला सांगितलं ,
तेवढ्या वरच नाही थांम्बलं तर LIC ने शहीदांना Rs.२८८०४२ देऊन स्वताची Ad मिरवली ,
पण
पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता
पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....


आरोप प्रत्याआरोप झाले ,
मोठया मोठया नेत्यांचे राजीनामे झाले ,
पुन्हा नविन नविन वचने झाली ,
पुन्हा नविन दावे झाले , Posters लावले ,
श्रधांजलि वाहिली ,
ज्यानी जवळच्याना गामावलं त्यांना मात्र अश्रु कमी पडले ,
पण
पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता
पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....

आता आपण मुम्बैकर मग आपला "Spirit" म्हणजे काय आहे?
तर ते आपण आपल्या रोजच्या Routine ला आपण दिलेले नाव आहे ,
आपल्या कड़े दूसरा Option नाही ,
आणि बाहेर पडल्याशिवाय हातात पैसा नाही ,
पण
पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता
पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....


तेवढ्यात T.V. union ची strike संपली ,
News Channels पुन्हा दूसरी काहीतरी Exclussive News शोधायला लागले ,
मग " Mumbai Terror " चा " Reality Show " संपला ,
आणि "Daily soaps " छे " New Episodes " चालु झाले ,
मग पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता
पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....

No comments:

Post a Comment