Tuesday, April 7, 2009

...........शब्द..........

शब्दांच आणि आपलं नात् कस असत ,
शब्दांन्शिवाय जगण काय मरण सुद्धा जमल नसत ...

शब्द कात्री सारखे असतात,
जन्मभरच्या नात्यांचा धागा सहजच कापून टाकतात ...

शब्द दगडा सारखे असतात ,
लक्ष्य नसताना आपल्याला ठेस मारून जखमी करतात ...

शब्द गुलाबाच्या फुलांसारखे असतात ,
सुंदर दिसतात, सुवासिक देखिल असतात पण त्यांनाही काटे असतात...

शब्द काट्यांसारखे असतात ,
अवघड वाटेवरून चालताना पायात रुततात ...

शब्द चापलांसारखे असतात ,
उन्हात चालताना निदान पायाला चटकेतरी लागू दीत नाहित ...

शब्द तलवारिसारखे असतात ,
म्यानातून काढल्यावर वाद निर्माण करतात ...

शब्द दिव्यांसारखे असतात ,
अंधारात प्रकाश देऊन मार्ग दाखवतात ...

शब्द चाकांसारखे असतात ,
एकाच Axis भोवती फिरत असतात ...

शब्द घडयाळांसारखे असतात ,
आपल्या जवळ असतात पण आपल्या हातात नसतात ...

शब्द औशधांसारखे असतात ,
कडू असतील तरी घ्यावीच लागतात...

शब्द Injection सारखे असतात ,
घेताना दुखतात पण तेच आपल्याला लवकर बरे करतात...

शब्द बंदुकितुन निघालेल्या गोळी सारखे असतात ,
एकदा सोडल्यावर परत येत नाहीत् ...

शब्द Ball-Pen सारखे असतात ,
लिहिता येतात आणि खोडलेतरी दिसतात ...

शब्द नात्यांत असतात , शब्द भांडनात असतात ,
शब्द शब्दांत असतात , शब्द सगळ्यांतच असतात ....

No comments:

Post a Comment