Tuesday, April 14, 2009

......... प्रेम म्हणजे प्रेम ..........

....... प्रेम म्हणजे प्रेम .............

प्रेम म्हणजे प्रेम ,
त्यात आयुष्याचा गेम
प्रेमाचा नसतो नेम ,
गाढव आणि प्रेमी दोघे एकदम सेम ...

प्रेमात कोणी जूळत,
तर कोणी पूर्णपणे विखरत ...

प्रेमात कोणी तळा पर्यंत बुडून जात् ,
तर कोणी प्रेमावरच तरंगत ...

प्रेम दाखवते अनेकांना आशा ,
पण होते बर्याचदा निराशा ...

फिरायच्या असतात बर्याच दिशा ,
पण फाटक्या पाकिटाच्या दशा .

प्रेमात स्वप्ना दिसतात ,
प्लॅटफॉर्मवरुन बर्याच ट्रेन्स सूटतात ...

आधी रुस्तात मग हसतात ,
जवळची नाती तुटतात ...

.....प्रश्न......

.....प्रश्न......

प्रश्न कसे विचित्र असतात ,
साध्या सरळ रेषेला वाकड़ करून पूर्ण विराम लावतात ...

आपल्या अस्तित्वा बद्दलचे प्रश्न आपल्या आधी सुरु होतात ,
आणि आपल्या जान्या नंतर देखिल चालु राहतात ...

सुरुवातीला अगदी साधे सोपे असतात ,
नंतर कठिन होत जातात...

आधी एखाद्या शब्दाचेच अस्सतात ,
नंतर +,-पासून integrator, differentiators पर्यन्त पोहचतात ...

कधी कधी Pythagoras किव Newtons Laws ने सूटतात ,
तर कधी कशाचाही उपयोग होत नाही ...

कधी प्रश्न Personal असतात ,
तर कधी ते सग्ल्यान्चेच असतात ...

प्रश्न अभ्यासाचे असतात ,
प्रश्न Future, Carrier, Life चे असतात ,
प्रश्न नात्यांचे, मैत्रीचे ...प्रेमाचे असतात ,
काही प्रश्न तर असेच असतात ...

प्रत्येक उत्तराला निदान एकतरी प्रश्न असतो ,
पण प्रत्येक प्रश्न ला उत्तर असतेच असे नाही ...

प्रश्न भरपूर असतात ,
तरी उत्तरे मात्र थोडीच असतात ...

प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली की Prizes भेटतात ,
त्यानेच Slumdogs चे Millionaire देखिल होतात ...

चुकीच्या उत्तरानादेखिल Negative Marking असतात ,
Wrong answers समोर्च्यान्वर Wrong Impression पाडतात ...

प्रश्न सग्ल्यान्च्याच आयुष्यात असतात ,
उत्तरे मात्र काहिनाच देता येतात ...

याच प्रश्नांच्या गर्दित काही प्रश्न मनाला लागतात ,
तर काही प्रश्न जगायला शिकवतात ...
प्रश्नान्शिवाय जगण अशक्य आहे हेच दाखवतात ...

...... जीवन .........

...... जीवन .........



जीवन कसं असतं ?
जगण्या पेक्शा मरणं सोप असतं ...

स्वप्नान मागे धवायाच असतं ,
पण नेहमी च्या ट्रेन ला मातृ सोडायच नसतं ...

मनातल्या मनात रडायच असतं ,
पण चेहर्या वर मातृ स्मितहास्य दाखावावं लागतं ...

आपल्याबरोबर चे सगळेच भरपूर पुढे गेलेले दीस्तात ,
पण आपणच मागे का? याबद्दल अनेक प्रश्न पडतात...

कधी कधी आयुष्य एकाच क्षणात संपतं ,
तर कधी एक क्षण जीवनभर संपतच नाही असं वाटतं ...

जीवन आपलच असतं ,
पण आपण इतरांसाठी का जगतो ते ठाऊक
नसतं ...

मरणं आपल्या हातात नसतं असे लोक म्हणतात ,
मग जगनं तरी कुठे आपल्या हातात असतं याचा विचार करायला ते विसरतात ...

....... आयुष्य कसं जगावं !!!.....

आयुष्य कसं जगावं ,
मला वाटतं कोणाला तरी विचारून बघावं ...

थांम्बत थांम्बत चालणार्या त्या Train ला विचारावं की ,
कोणासाठी ना थांम्ब्नार्या घड्याळाला विचारावं ...


स्वतः संपूर्ण संपून थोडासा काळोख झाकणार्या त्या मेंबत्ती ला विचारावं की ,
न संपता जास्त प्रकाश देणार्या Tube-Light ला विचारावं ...

जन्मभर एकाच जागी स्थिर राहणार्या त्या झाडाला विचारावं की ,
सगळीकड़े फिर्नार्या त्या अस्थिर वार्या ला विचारावं ...

आयुष्य कसा जगावं माला वाटतं ,
कोणाला तरी विचारून बघावं ...


दगडावर घासून त्या दगडालासुधा सुगंधी करणार्या त्या चंदानाला विचारवं की ,
त्याच दगडावर घासून आपल्या त्वचेला रक्ताबम्बाळ करणार्या त्या धारदार
सुर्याला विचारवं ...

उत्साह देणार्या त्या सुर्याला विचारवं की ,
स्वप्न दाखावानार्या त्या काळोखाताल्या अन्धाराताल्या चंद्राला विचारवं ...

दोन जिवांना जोडून ठेवानार्या त्या मोबाइल फ़ोन ला विचारवं की ,
गरजेच्या वेळी उपयोगी न पडनार्या आशा Network ला विचारवं ...

पैसे मोजनार्या Accountant ला विचारवं की ,
लपून लपून त्याच पैश्यांची चोरी करणार्या त्या चोराला विचाराव ...

आयुष्य कसा जगावं ,
माला वाटतं कोणाला तरी विचारून बघावं ...

पाण्याच्या एका थेंम्बाला विचारवं की ,
अनेक थेंम्बांना एकत्र आनुन तहांन बुज़वानार्या नदीला विचारावं ...

वोट मागणार्या मंत्र्याला विचारावं की ,
उपास्मारिने मर्नार्या त्या शेतकर्याला विचारावं ...


दूध देणार्या गाईला विचारावं की ,
बांधून ठेवलेल्या त्या वासराला विचरावं ...


Placement झालेल्या त्या सोन्याला विचारावं की ,
Drop लागलेल्या त्या कारट्याला विचारावं ...

आयुष्य कस् जगावं ,
मला वाटतं कोणालातरी विचारून बघावं ...

... मुम्बैकरांचं " Spirit " .....

 ... मुम्बैकरांचं " Spirit " .....



आता पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....
Terrorists
नि पूर्ण ताकतीने हल्ला केला ,
मुंबई ला पुन्हा Target केलं ,
News Channels
वाल्यानी सगळं Cover केलं ,
प्रत्येक footage मागे हे " Exclusive " आमचेच म्हणुन भांडन केलं ,
दाखवायला Permission नाही सांगत सगळं दाखवलं ,
मृत आत्म्यांना शान्ति देतानाच्या Ads चे Cost वाढवलं ,
पण पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता
पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....


अशातच मोठ मोठ्या नेत्यांची मुंबई यायची Race चालु झाली ,
घटना स॒थळांना, Hospitals ना आणि शाहिदान्च्या घरांना भेट झाली ,
मृत आणि शाहिदान्साठी दुख व्यक्त करताना मोठया मोठ्या Amounts ची घोषणा झाली ,
पण
पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता
पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....


आताच्याया mobile युगात sms ची देखिल भर पडली ,
कोणी मराठी माणूस कुठे आहे असा विचारलं ,
तर कोणी Yes साथी 'Y' आणि No साथी 'N' Type करायला सांगितलं ,
तेवढ्या वरच नाही थांम्बलं तर LIC ने शहीदांना Rs.२८८०४२ देऊन स्वताची Ad मिरवली ,
पण
पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता
पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....


आरोप प्रत्याआरोप झाले ,
मोठया मोठया नेत्यांचे राजीनामे झाले ,
पुन्हा नविन नविन वचने झाली ,
पुन्हा नविन दावे झाले , Posters लावले ,
श्रधांजलि वाहिली ,
ज्यानी जवळच्याना गामावलं त्यांना मात्र अश्रु कमी पडले ,
पण
पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता
पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....

आता आपण मुम्बैकर मग आपला "Spirit" म्हणजे काय आहे?
तर ते आपण आपल्या रोजच्या Routine ला आपण दिलेले नाव आहे ,
आपल्या कड़े दूसरा Option नाही ,
आणि बाहेर पडल्याशिवाय हातात पैसा नाही ,
पण
पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता
पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....


तेवढ्यात T.V. union ची strike संपली ,
News Channels पुन्हा दूसरी काहीतरी Exclussive News शोधायला लागले ,
मग " Mumbai Terror " चा " Reality Show " संपला ,
आणि "Daily soaps " छे " New Episodes " चालु झाले ,
मग पुन्हा मुंबई जागी झाली ,
आता
पुन्हा मुम्बैकरांचं " Spirit " दिसलं ....

............. आयुष्य ............

 .............  आयुष्य  ............


आयुष्य कुठल्या वळनावर आलय...
कुठल्याही गोष्टीचा हट्ट करायेचे वे आता गेलय....
तर स्वताहून एखादी गोष्ट करायेचे वय अजुन यायचेय...


विचारांचा आपसात भांडचालले
इछा आकंशांचा दशक्रिया विधि उराकतोय
स्वप्नांचा तेवढा उजेड दिसतोय
पण डोळ्यात पान्यापलिकडे अंधारच दाटलाय


हातावरच्या रेशान्मधे Future उज्वल दिसते
पण जन्मापासून रेशा त्याच हातांवर आहेत
मग अजुन Future कुठे बदलते...


आता सगळयाकडुन होताहेत हशा
रस्त्याकडेच्या आम्ब्याच्या झाड़ासारखी झालि दशा ...
जो येतो तो दगड मारून जातो
आणि दगडात फळ नाही पडला तर जाता जाता दोन शिव्या देखिल देऊन जातो


आयुष्य कुठल्या वळनावर आलय ,
आयुष्य असच संपून चालले ,
पण आजुन जगायचे राहून गेलय ......

Tuesday, April 7, 2009

...........शब्द..........

शब्दांच आणि आपलं नात् कस असत ,
शब्दांन्शिवाय जगण काय मरण सुद्धा जमल नसत ...

शब्द कात्री सारखे असतात,
जन्मभरच्या नात्यांचा धागा सहजच कापून टाकतात ...

शब्द दगडा सारखे असतात ,
लक्ष्य नसताना आपल्याला ठेस मारून जखमी करतात ...

शब्द गुलाबाच्या फुलांसारखे असतात ,
सुंदर दिसतात, सुवासिक देखिल असतात पण त्यांनाही काटे असतात...

शब्द काट्यांसारखे असतात ,
अवघड वाटेवरून चालताना पायात रुततात ...

शब्द चापलांसारखे असतात ,
उन्हात चालताना निदान पायाला चटकेतरी लागू दीत नाहित ...

शब्द तलवारिसारखे असतात ,
म्यानातून काढल्यावर वाद निर्माण करतात ...

शब्द दिव्यांसारखे असतात ,
अंधारात प्रकाश देऊन मार्ग दाखवतात ...

शब्द चाकांसारखे असतात ,
एकाच Axis भोवती फिरत असतात ...

शब्द घडयाळांसारखे असतात ,
आपल्या जवळ असतात पण आपल्या हातात नसतात ...

शब्द औशधांसारखे असतात ,
कडू असतील तरी घ्यावीच लागतात...

शब्द Injection सारखे असतात ,
घेताना दुखतात पण तेच आपल्याला लवकर बरे करतात...

शब्द बंदुकितुन निघालेल्या गोळी सारखे असतात ,
एकदा सोडल्यावर परत येत नाहीत् ...

शब्द Ball-Pen सारखे असतात ,
लिहिता येतात आणि खोडलेतरी दिसतात ...

शब्द नात्यांत असतात , शब्द भांडनात असतात ,
शब्द शब्दांत असतात , शब्द सगळ्यांतच असतात ....