Showing posts with label आयुष्य. Show all posts
Showing posts with label आयुष्य. Show all posts

Sunday, November 20, 2011

.... स्वप्न...

.... स्वप्न ....




स्वप्न ..... स्वक़्प्न कशी असतात ... म्हणजे सगळ्यांसाठी वेगवेगळी असतात .... पण प्रत्येक जन त्याला कश्या बरोबर तरी compare  करतो .... माझ्या काही मित्राना विचारला तर त्यांनी सांगितलं ... "Dreams are those which can never turn into reality" ... Dreams are Uncontrolled" .... "Dreams can sometimes turn into reality" .... "Dreams is is the our place of having whatever we want..."


.... स्वप्न ....


स्वप्न आकाशातल्या काळ्या ढगांसारखी असतात ....
जसे आकाशात काळे ढग दाटून आले कि पाऊस पडतो ....
कोरड्या डोळ्यांत स्वप्न दाटून आली कि ...
डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागातात ....


स्वप्न समुद्र किनार्यावर बांधलेल्या .....
वाळूच्या बंगाल्यांसारखी असतात ....
कितीही सुंदर असली तरी ...
पाण्याची एक लाट त्यांना पुन्हा ..... 
वाळूत लपउन टाकते .... 


स्वप्न "प्रेम प्रकरणा" सारखी असतात ....
हसवतात .... रडवतात .....
दिवस रात्र जागवतात ....
भरपूर वेळा तुटतात  .... 
पण थोडं दुख संपला कि ......
पुन्हा डोळ्यांसमोर नव्याने उभी असतात ....


स्वप्न break  fail झालेल्या cars सारखी असतात .... 
अगदी Uncontrolled  .....
कितीही ताकत लाऊन breaks  लावले तरी नाही थांबत ....
आणि शेवटी कुठल्यातरी दिवाळाला आदळूनच थांबतात ...


स्वप्न "Adobe  Photoshop " सारखी असतात ....
कुणालाही कुठे हि थांबू देतात ...
कोणाही सोबत राहू देतात ....
पण workload  असताना open  केला तर ....
System  hang  करतात ....


स्वप्न प्रश्ना सारखी असतात ....
Unanswered  ....
Unknown  ....
always  new .....
पण बर्याच वेळा त्यांचे answers  same  असतात ... 


स्वप्न पाण्या सारखी असतात ....
तहान भागउ  सकतात ....
त्यात भिजउ शकतात ....
तरंगउ शकतात ....
पण पोहत पोहत किनारा गाठायला ....
भरपूर मेहनत करून घेतात ....


स्वप्न आपल्या जुन्या मित्रां सारखी असतात ...
जेव्हा भेटू तेव्हा ... एकदम छान feel  करून देतात ....
कितीही tenssion  असला तरी ....
त्यांच्या सोबत असताना .....
life  अगदी smooth  असल्यासारखी feeling  देतात ....



Sunday, May 8, 2011

..... आई .....

..... आई .....


जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू ते मी काढलेलं पहिलं चित्र ...
Showcase च्या त्या काचेत ठेवलंस ...
ते पाहून मला अजून एक चित्र काढावसं वाटलं ....

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू त्या मागच्या खिडकीतल्या मांजरीला ....
भरलेल्या वाटीतून दुध प्यायला द्यायचीस ...
तेव्हा मला समजलं .. कि प्राण्यांवर दया करावी ...

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू फक्त माझ्या वाढदिवसासाठी ...
ती खीर बनवायाचीस ....
आणि मला समजलं की ....
आयुष्यात या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा...
किती महत्वाच्या असतात ना ....

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू त्या देव्ह्यार्यापाशी प्रार्थाना म्हणायचीस ....
तेव्हा मला वाटायचं . की ...
तिथे देव आहे ... आणि तो तुझ्याशी बोलतो ....

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू माझ्या केसांतून प्रेमाने हात फिरावायाचीस ...
तेव्हा मला प्रेमाचा अर्थ समजला ...

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
मी तुझ्या डोळ्यांत अश्रू पाहिले ...
तेव्हा मला समजलं की ...
कधी कधी काही गोष्टीं मुळे दुख होतं ...
तेव्हा रडलं तरी चालतं  ...

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू हसायचीस ....
तेव्हा मला वाटायचं ...
मीही नेहमी हसत राहावं ...
आणि तुझ्या सारखं छान दिसावं ...

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
मी आजारी असताना तू कितीतरी रात्री ...
माझ्या काळजीत जागून घालवल्यास ...
तेव्हा मला समजलं ...
Doctor नुसती औषधे देतो ... बरं नाही करत ...

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू माझी काळजी घेतलीस ...
तेव्हा मला समजलं ...
मी तुझ्या साठी .... काहीही केलं तरी ...
तुझे उपकारांची मी परतफेड करू शकत नाही ....

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
पण .... मी पाहिलं ....
आणि मला बरंच समजलं ...
तुझ्या शिवाय मी नसतोच .....
आणि माझ्या आयुष्यात तूच देव आहेस ....
..... Thank you आई ...... Thank you ....

Sunday, January 17, 2010

..... काहीतरी करायचं राहिलं ......

..... काहीतरी करायचं राहिलं ......




जन्मलो तेव्हा रडत होतो.... मग हसायला लागलो ,
रेंगाळता रेंगाळता चालता आलं ,... मग उभा राहून धावायलाही लागलो ...

ग म भ न गिरवलं ... मग A B C D रखडली ...
दोनात चार मिळवले ... आणि त्यातून तीन वजा सुद्धा केले ...

जसा मोठा झालो तसे numbers सुद्धा मोठे झाले ,
+ आणि - बरोबर *, / आणि नंतर derivation, integration सुद्धा आले ...

पाढे रटले तेवढ्यात वर्ग मग... घन आले ...
गणित काय कमी होतं म्हणून अजुन विषय वाढवले ...

आधी O2, CO2, .... H2O मग ...
पूर्ण Periodic Table सुद्धा राटावे लागले ...

HCl ने कपड्यांना होल्स पाडले ,
Ammonia ( NH3) च्या वासाने डोके भीन भिनले ...

कांद्याच्या पातिने डोळ्यात पाणी आणले ,
अमिबा चे चित्र इतके सोपे होते की बंद डोळ्यांनी देखिल ते काढता आले ...

शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली ,
1857 च्या उठावानंतर भारतात स्वातंत्र्य संग्रामाची लाट पसरली ...

माणसाची उत्क्रांती कशी झाली? चीन मधे क्रांति कोणी केली ?
World War केव्हा केव्हा झाले? हिटलर ला कोणी व कसे मारले?

गांधी, नेहरू, टिळक, आंबेडकर, वल्लभभाई पटेल...
हे सगळे सुद्धा इतिहासात येउन गेले ...

भारताचे कायदे आणि घटना , नेहमीच पेपरात 10 मार्क्स ला आल्या,
माणसाचे मुलभुत हक्क आणि गरजा , नागरिक शास्त्रात धडा दुसरा पान नंबर सतरा ...

भूगोलात वाळवंट, पठार ... दगड मात्यांचे वेगवेगळे प्रकार ,
विषुवृत्ताच्या पट्यात ऊन , तर अंटार्टिका मधे ठंडी फार ...

नैऋत्य मानसून वारे कशामुळे वाहतात ?
आफ्रिकेच्या जंगलात कुठले वन्यजीव आढ़ळतात ?

पृथ्वी वर 71 टक्के पाणी आणि 29 टक्के जमिन आहे ...
असं आहे, तर माणूस चंद्रावर जाण्यापेक्षा पाण्यात रहायला का शिकत नाही ?

Faraday's, Norton's, Ohm's आणि Coulomb's Laws झाले ...
Einstein च्या current ने नेहमीच shock दिले ...

KVL, KCL circuits मधे टाकुन voltages काढले ...
Y, Z, H, आणि Laplace Transforms सुद्धा काढले ...

Acceleration, velocity, force, friction, truss, strain आणि stress वगैरे वगैरे ...
काढता काढता calculator चे सेल्स सुद्धा संपले ...

आत्तापर्यंत केलेले numbers फ़क्त Decimal होते म्हणून कदाचित ...
Binary, Octal आणि Hexadecimal मधे तेच numbers वेगवेगळे दाखवले ...

BJT, FET, JFET च्या fabrication steps पाहिल्या आणि circuits सुद्धा बनवले ...
8085, 8086 पासून ते मग micro controller चे सुद्धा programs केले ...

C, C++, java, Oracle.... SQL ...या सुद्धा Languages होत्या ...
कोणत्या Radar साठी कोणती आणि Broadcasting साठी Antenna कोणत्या होत्या?

Call splitting पासून Inter cell, intra cell, hard, soft handoffs सुद्धा झाले ...
Call Transfer पासून satellite phones चे सगळे concepts आणि working principle समजुन घेतले ....

त्यांनी आधी digital communication मग networking शिकवलं ,
नंतर secure communication साठी Securities ला सुद्धा syllabus मधे टाकलं ...

सगळे म्हटले तेच कर जे पुस्तकात लिहलय ,
मी ही तेच कल जे सगळ्यांनी केलय ...

या सगळ्यात कुठेतरी काहीतरी करायचं राहून गेलय ,
सगळ्यांच ऐकलं ... पण या सगळ्यांत मनाचं ऐकायाच राहून गेलय ...

सगळ्यांच ऐकण्यात आयुष्य जायला नको ...
म्हणून आता मनाचं ऐकायचं ठरवलय ...

इकडच्या या "Narrow Minded" गल्ल्या संपतच नाहित ...
म्हणून मग आता वेगळ्याच रस्त्याने जायचं ठरवलं ...






कोणी साथ दिली की त्यांच्या बरोबर ...
किंवा एकट्यानेच लढ़ायचं ठरवलय ...


Monday, November 2, 2009

.... कोणीच कोणाचं नसतं ! .....

....... कोणीच कोणाचं नसतं ! ......



या जगात कोणीच कोणाचं नसतं ,
जे काही आहे ते तुझं नी माझं ,
या सगळ्यात आपल असं काही नसतं ...

ज्याचा कही Use होतो तो मित्र ,
आणि ज्यामुळे Problem होतो तो शत्रु असतो ,
Financial Condition चांगली असेल की मग शत्रु देखिलच लवकरच मित्र बनतो...

कोणी तुझी काळजी नाही करत ,
कोणी तुझ्या दुखातही नाही रडत ,
कोणाच्याही डोळ्यांतुन पाण्याचा थेंबही नाही पडत ...

कोणी तुझी वाट नाही पाहत ,
तुझ्यासाठी कोणी नाही थांबत ,
तुझ्यापेक्षा त्यांना Time चीच Value जास्त असते ....

कोणीच तुझी आठवण नाही काढणार ,
तू हे जग सोडून गेलास तरी - दिवसांत ,
इथे प्रत्येकाची Life .... "Back to Normal " असणार ...

विनाकारण कोणी तुला साधा SMS सुद्धा नाही करणार ,
पण जर त्यांना तुझी गरजच पडली तर ,
तुला Call करून भेटायला सुद्धा येणार ...

म्हणुनच तुही सगळ्यां सारखा Selfish व्हायला शिकून घे ,
फक्त कामापुराताच Talk-Time वापरायला शिकून घे ,
म्हणजे कदाचित तुही त्यांच्या सारखा Successful होशील ...

Actually सगळेच Selfish नसतील तसे ,
आपणच कुठेतरी चुकत असणार ,
कारण आपण त्यांच्या बद्दल ज़रा जास्तच " Expectations " ठेवत असणार ...

Sunday, May 17, 2009

..... तू .....

..... तू .....


प्रेम माझे तू आहेस ,
प्रेयसी ही तूच आहेस ,
साथ माझी तू आहेस ,
वेड माझे तूच आहेस ...

तूच माझे बोल ,
माझी कविता तूच आहेस ,
तूच माझे शब्द ,
वाक्य माझे तूच आहेस ...

रात्र माझी तू आहेस ,
दिवस माझा तू आहेस ,
तूच इन्द्रधनुष्य माझा ,
पावसातही तूच आहेस ...

देव माझा तू आहेस ,
धर्म देखिल तूच आहेस ,
भाव माझे तू आहेस ,
भवनांतही तूच आहेस ...

तूच माझी बाग़ , त्यात
फुल देखिल तूच आहेस ,
रंग त्या फुलांचा नी ,
गंध त्यांचा तूच आहेस ...

Mobile मी असेन तरी ,
Network माझा तूच आहेस ,
Bulb मी असेन तरी ,
Current माझा तू आहेस ...

तूच माझा Past Tense ,
Present देखिल तूच आहेस ,
Future मधे नसशील तर ,
The - End माझा तूच आहेस ...

स्वप्न माझे तू आहेस ,
स्वर्ग माझा तूच आहेस ,
जीवनात या माझ्या ,
सर्व काही तूच आहेस ...

........यालाच जगणं अस म्हणायच ?.........

..यालाच जगणं अस म्हणायच ?..



दुखाच्या उन्हात घाम गाळायचा ,
रात्री दुखाच्या अंधारातच रडायचे ,
त्यातच एखादी सुखाच्या थंड वार्याची
झुळूक आली
की तिचा फक्त गारवा मनात साठून ठेवायचा ,
पुन्हा दुखाच्या गारव्याने मनाला थंड वाटुन घ्यायच....
यालाच जगणं अस म्हणायच ???

एखाद स्वप्न
बघायचं ,
ते पूर्ण करायला धड्पड़ायचं ,
अशातच स्वप्न तुटल की थोड्स रडायच ,
आणि पुन्हा नविन स्वप्ना मागे धवायाच ,
यालाच जगण अस म्हणायच ???

कोणाच्या तरी प्रेमात पडायच ,
लपून छ्पून भेटायच ,
एकाने रुसायच ... दुसर्याने हसवायच ,
कुठल्यातरी Miss Understanding मुळे वेगळं व्हायच ,
मनात त्याचीच आठवण ठेउन पुन्हा दुसर्या प्रेमाच्या शोधात लागायच ,
यालाच जगण अस म्हणायच ???

लहान असताना आई वडीलांसाठी शिकायच ,
शाळेच्या शेवटी चांगल College भेटावा म्हणुन शिकायच ,
नंतर चांगल Future , Job , Life Partner भेटायला शिकायच ,
लग्ना नंतरही Family साठी , Promotion साठी शिकायच ,
त्यातच आपल्या आणि इतरांच्या अनुभवातून सुद्धा शिकायच ,
यालाच जगण अस म्हणायच ???

हसायच ....., रुसायच .....,
रागवायच ....., रडायच ........,
काही वेळाने सगळं विसरून पुन्हा हसायचं ,
यालाच जगण अस म्हणायच ???

Tuesday, April 14, 2009

...... जीवन .........

...... जीवन .........



जीवन कसं असतं ?
जगण्या पेक्शा मरणं सोप असतं ...

स्वप्नान मागे धवायाच असतं ,
पण नेहमी च्या ट्रेन ला मातृ सोडायच नसतं ...

मनातल्या मनात रडायच असतं ,
पण चेहर्या वर मातृ स्मितहास्य दाखावावं लागतं ...

आपल्याबरोबर चे सगळेच भरपूर पुढे गेलेले दीस्तात ,
पण आपणच मागे का? याबद्दल अनेक प्रश्न पडतात...

कधी कधी आयुष्य एकाच क्षणात संपतं ,
तर कधी एक क्षण जीवनभर संपतच नाही असं वाटतं ...

जीवन आपलच असतं ,
पण आपण इतरांसाठी का जगतो ते ठाऊक
नसतं ...

मरणं आपल्या हातात नसतं असे लोक म्हणतात ,
मग जगनं तरी कुठे आपल्या हातात असतं याचा विचार करायला ते विसरतात ...

....... आयुष्य कसं जगावं !!!.....

आयुष्य कसं जगावं ,
मला वाटतं कोणाला तरी विचारून बघावं ...

थांम्बत थांम्बत चालणार्या त्या Train ला विचारावं की ,
कोणासाठी ना थांम्ब्नार्या घड्याळाला विचारावं ...


स्वतः संपूर्ण संपून थोडासा काळोख झाकणार्या त्या मेंबत्ती ला विचारावं की ,
न संपता जास्त प्रकाश देणार्या Tube-Light ला विचारावं ...

जन्मभर एकाच जागी स्थिर राहणार्या त्या झाडाला विचारावं की ,
सगळीकड़े फिर्नार्या त्या अस्थिर वार्या ला विचारावं ...

आयुष्य कसा जगावं माला वाटतं ,
कोणाला तरी विचारून बघावं ...


दगडावर घासून त्या दगडालासुधा सुगंधी करणार्या त्या चंदानाला विचारवं की ,
त्याच दगडावर घासून आपल्या त्वचेला रक्ताबम्बाळ करणार्या त्या धारदार
सुर्याला विचारवं ...

उत्साह देणार्या त्या सुर्याला विचारवं की ,
स्वप्न दाखावानार्या त्या काळोखाताल्या अन्धाराताल्या चंद्राला विचारवं ...

दोन जिवांना जोडून ठेवानार्या त्या मोबाइल फ़ोन ला विचारवं की ,
गरजेच्या वेळी उपयोगी न पडनार्या आशा Network ला विचारवं ...

पैसे मोजनार्या Accountant ला विचारवं की ,
लपून लपून त्याच पैश्यांची चोरी करणार्या त्या चोराला विचाराव ...

आयुष्य कसा जगावं ,
माला वाटतं कोणाला तरी विचारून बघावं ...

पाण्याच्या एका थेंम्बाला विचारवं की ,
अनेक थेंम्बांना एकत्र आनुन तहांन बुज़वानार्या नदीला विचारावं ...

वोट मागणार्या मंत्र्याला विचारावं की ,
उपास्मारिने मर्नार्या त्या शेतकर्याला विचारावं ...


दूध देणार्या गाईला विचारावं की ,
बांधून ठेवलेल्या त्या वासराला विचरावं ...


Placement झालेल्या त्या सोन्याला विचारावं की ,
Drop लागलेल्या त्या कारट्याला विचारावं ...

आयुष्य कस् जगावं ,
मला वाटतं कोणालातरी विचारून बघावं ...

............. आयुष्य ............

 .............  आयुष्य  ............


आयुष्य कुठल्या वळनावर आलय...
कुठल्याही गोष्टीचा हट्ट करायेचे वे आता गेलय....
तर स्वताहून एखादी गोष्ट करायेचे वय अजुन यायचेय...


विचारांचा आपसात भांडचालले
इछा आकंशांचा दशक्रिया विधि उराकतोय
स्वप्नांचा तेवढा उजेड दिसतोय
पण डोळ्यात पान्यापलिकडे अंधारच दाटलाय


हातावरच्या रेशान्मधे Future उज्वल दिसते
पण जन्मापासून रेशा त्याच हातांवर आहेत
मग अजुन Future कुठे बदलते...


आता सगळयाकडुन होताहेत हशा
रस्त्याकडेच्या आम्ब्याच्या झाड़ासारखी झालि दशा ...
जो येतो तो दगड मारून जातो
आणि दगडात फळ नाही पडला तर जाता जाता दोन शिव्या देखिल देऊन जातो


आयुष्य कुठल्या वळनावर आलय ,
आयुष्य असच संपून चालले ,
पण आजुन जगायचे राहून गेलय ......