Showing posts with label आठवण. Show all posts
Showing posts with label आठवण. Show all posts

Tuesday, September 17, 2013

…... प्रेम तर व्हायचंच होतं …..

…. प्रेम तर व्हायचंच होतं ….. 


प्रेम तर व्हायचंच होतं... 
लफड्यात तर पडायचंच होतं …. 
try तर बरंच केलं मी …. 
पण जे कुणीतरी लिहून ठेवलंय ते तर व्हायचंच होतं …. 
प्रेम तर व्हायचंच होतं…… 

रात्रीचं जगायचं होतं …. 
Whole day ढगांत तरंगायचं होतं …. 
कोणाच्यातरी नादात…. 
mobile चे bills भरायचे होते…. 
प्रेम तर व्हायचंच होतं…

काम धंद्यांचे वांदे व्हायचे होते …. 
appraisal list मधून नाव delete व्हायचे होते …. 
overtime चे income संपून …
half-day चे deductions व्हायचेच होते …. 
प्रेम तर व्हायचंच होतं…. 

बंद डोळ्यांत स्वप्नं …. 
आणि उघड्या डोळ्यांतून पाणी तरंगायचंच होतं …. 
गर्दीत एक एकट वाटायचंच होतं …. 
हसता हसता चुकून रडायचंच होतं …. 
प्रेम तर व्हायचंच होतं….. 

कोणाच्या तरी आठवणीत संपूर्ण दिवस waste करायचाच होता …. 
कोणाचातरी चेहरा डोळ्यांसमोर ठेऊन …. 
कागदांवर दोन चार lines लिहायच्याच होत्या …. 
कश्यातरी rhyme करून …… 
यासारख्या पोएम्स बनयच्याच होत्या …. 
प्रेम तर व्हायचंच होतं…



Sunday, May 8, 2011

..... आई .....

..... आई .....


जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू ते मी काढलेलं पहिलं चित्र ...
Showcase च्या त्या काचेत ठेवलंस ...
ते पाहून मला अजून एक चित्र काढावसं वाटलं ....

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू त्या मागच्या खिडकीतल्या मांजरीला ....
भरलेल्या वाटीतून दुध प्यायला द्यायचीस ...
तेव्हा मला समजलं .. कि प्राण्यांवर दया करावी ...

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू फक्त माझ्या वाढदिवसासाठी ...
ती खीर बनवायाचीस ....
आणि मला समजलं की ....
आयुष्यात या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा...
किती महत्वाच्या असतात ना ....

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू त्या देव्ह्यार्यापाशी प्रार्थाना म्हणायचीस ....
तेव्हा मला वाटायचं . की ...
तिथे देव आहे ... आणि तो तुझ्याशी बोलतो ....

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू माझ्या केसांतून प्रेमाने हात फिरावायाचीस ...
तेव्हा मला प्रेमाचा अर्थ समजला ...

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
मी तुझ्या डोळ्यांत अश्रू पाहिले ...
तेव्हा मला समजलं की ...
कधी कधी काही गोष्टीं मुळे दुख होतं ...
तेव्हा रडलं तरी चालतं  ...

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू हसायचीस ....
तेव्हा मला वाटायचं ...
मीही नेहमी हसत राहावं ...
आणि तुझ्या सारखं छान दिसावं ...

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
मी आजारी असताना तू कितीतरी रात्री ...
माझ्या काळजीत जागून घालवल्यास ...
तेव्हा मला समजलं ...
Doctor नुसती औषधे देतो ... बरं नाही करत ...

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
तू माझी काळजी घेतलीस ...
तेव्हा मला समजलं ...
मी तुझ्या साठी .... काहीही केलं तरी ...
तुझे उपकारांची मी परतफेड करू शकत नाही ....

जेव्हा तुला वाटायचं 
मला समजत नाही ...
पण .... मी पाहिलं ....
आणि मला बरंच समजलं ...
तुझ्या शिवाय मी नसतोच .....
आणि माझ्या आयुष्यात तूच देव आहेस ....
..... Thank you आई ...... Thank you ....

Tuesday, March 22, 2011

..... मला पुन्हा शाळेत जायचय ....

..... मला पुन्हा शाळेत जायचय ....


शाळेचे ते दिवस आठवले की ...
उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ....
bus -stop ची मागची ती शाळा पाहून ,
पुन्हा शाळेत जावसं वाटतं ....

शाळा आमची छान होती ...
Last bench वर आमची team होती ....
Cricket च्या वेळी ground वर cheating व्हायची ...
आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन मधल्या वडा-पाव साठी ....
साला नेहमीच line असायची ...

जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो ...
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ....
प्रतिज्ञा म्हणायचो ...
प्रार्थनेच्या वेळी मात्र .... सगळ्यांसारखे ...
नुसतेच ओठ हालवायचो ....

 पावसाळ्यात शाळेत जाताना ,
छत्री दप्तरात ठेऊन .... मुद्दामच भिजत जायचं ...
पुस्तक भिजू नये म्हणून ....
त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ....
शाळेतून येता येता ... एखाद्या डबक्यात उडी मारून ...
उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं ....

Black -board वर बोलणार्या मुलांमध्ये ....
Monitor नेहमीच आमचं नाव लिहायचा ...
नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे ...
हातावर duster चा व्रण असायचा ....
प्रयेत्येक Off -period ला P.T. साठी ....
आमचा आरडाओरडा असायचा ...
शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा ....
तो बर्फाचा गोळा संपवायचा ....

मुलीं बरोबर कितीही बोललो तरीही ....
कधी कोणी link नाही लावायचं ...
प्रत्येक महिन्यातून एकदातरी ...
डोक्यावरचे केस कापायचो ...
आणि आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात ....
शिव्या सूद्धा नाही द्यायचो ...

इतिहासात वाटतं .... होता शाहिस्तेखान ...
नागरिक शास्त्रात पंतप्रधान ....
गणित... भुमितीत होतं ... पायथागोरस च प्रमेय ... 
भूगोलात वाहायचे वारे .... नैऋत्य ... मॉन्सून ...
का कुठलेतरी ... वायव्य.... 
हिंदीतली आठवते ती "चिंटी कि आत्मकथा"
English मधल्या grammar नेच झाली होती आमची व्यथा ...

शाळेतल्या gathering चा dance ...
बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा ... तो मराठी चा तास ....
दरवर्षी नवीन भेटायचे ....
Uniforms आणि वह्या पुस्तकांचा set .....
पण नवीन दप्तरासाठी नेहमीच करावा लागायचा wait ....

शाळा म्हटली कि अजूनही आठवतात ....
desk वर pen ने त्या "pen fights" खेळणं ....
exams मधल्या ... रिकाम्या जागा भरणं ... आणि जोड्या जुळवणं ...
चिखलातल्या त्या football च्या matches ...
कबड्डीत ... पडून धडपडून ....
हातापायांवर आलेले scraches ...

खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा ....
मला पुन्हा लहान व्हायचं ....
हसायचं .... खेळायचं ....
मला पुन्हा शाळेत जायचं .... 


 

  



Sunday, October 17, 2010

.... आज पुन्हा ....



आज पुन्हा मला तुझी आठवण झाली,
आज पुन्हा मनात... त्या जुन्या क्षणांची साठवण झाली...

आज पुन्हा मी काहीतरी विसरलो,
आज पुन्हा मी तुझ्या विचारांत हरवलो...

आज पुन्हा तुला भेटावसं वाटलं,
आज पुन्हा तुझ्या बरोबर बोलावसं वाटलं...

आज पुन्हा चुकल्यासारखा मला जाणवलं,
आज पुन्हा माझं मन दुखावाल्यासारखं काहीसं घडलं...

आज पुन्हा in-box मधले तुझे mails वाचले,
आज पुन्हा तुझ्या calls ची वाट पाहिली...

आज पुन्हा मित्रां मध्ये मी एकटाच राहिलो,
आज पुन्हा मी एकट्यातच रडलो...

आज पुन्हा तू मला समजून न घेतल्याचा मला वाईट वाटलं,
आज पुन्हा कोणीच सोबती नसल्यासारखं मला वाटलं...

आज पुन्हा दिवसभारात काही नवीन नाही घडलं,
आज पुन्हा मी दिवसाला काल सारखंच संपवलं ....   

Sunday, October 10, 2010

..... राहिलं नाही ....




भरपूर मोठ्या रस्त्या वरून चाललोय ...
सोबती मात्र कोणी नाही ....

कुठेतरी शेवट असेल म्हणून चाललोय ....
पायांत ताकात मात्र अजिबात राहिली नाही ....

आयुष्य बाकी आहे म्हणून जगतोय ....
जगायची इच्छा मात्र राहिली नाही ....

मित्र आहेत .... बरेच आहेत ...
मैत्री मात्र राहिली नाही ....

प्रेमात पडलोय म्हणून प्रेम आहे ....
प्रेमावर विश्वास मात्र राहिलेला नाही ...

नाती आहेत म्हणून नातेवाईक आहेत ...
नात्यांतले संबंध मात्र राहिले नाही ....

घड्यालाहे म्हणून time आहे ....
वेळ मात्र कोणाकडेच राहिला नाही ... 

मंदिर आहे म्हणून देव आहे ....
देवावर विश्वास मात्र राहिलेला नाही ....

दोन पायांवर चालतो म्हणून माणूस आहे ...
माणुसकी मात्र राहिलेली नाही....


Wednesday, September 15, 2010

.... आठवणीतला पाऊस .....

.... आठवणीतला पाऊस .....


आठवणींच्या आरश्यात जेव्हा ....
डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात ....
त्या हलत्या आरशात मला ....
माझे दोन दोन चेहरे दिसतात ....

अश्रू होते का पाऊस ....
हे ओळखणेही अवघड जाते ....
अश्रू काय आणि पाऊस काय ....
पाहणार्याला दोन्ही सारखेच असते ....

बर्याचदा तुझ्या आठवणी ....
पावलं न वाजवताच येतात ....
जाताना मात्र मनाच्या रस्त्यात ....
तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात ....

अवेळी आलेला पाउसही ....
सगळं उध्वस्त करतो ....
भर दुपारी भरल्या ढगांनी ....
काळोखी संध्याकाळ करतो ....