Showing posts with label वाट बघता बघता. Show all posts
Showing posts with label वाट बघता बघता. Show all posts

Tuesday, September 17, 2013

…... प्रेम तर व्हायचंच होतं …..

…. प्रेम तर व्हायचंच होतं ….. 


प्रेम तर व्हायचंच होतं... 
लफड्यात तर पडायचंच होतं …. 
try तर बरंच केलं मी …. 
पण जे कुणीतरी लिहून ठेवलंय ते तर व्हायचंच होतं …. 
प्रेम तर व्हायचंच होतं…… 

रात्रीचं जगायचं होतं …. 
Whole day ढगांत तरंगायचं होतं …. 
कोणाच्यातरी नादात…. 
mobile चे bills भरायचे होते…. 
प्रेम तर व्हायचंच होतं…

काम धंद्यांचे वांदे व्हायचे होते …. 
appraisal list मधून नाव delete व्हायचे होते …. 
overtime चे income संपून …
half-day चे deductions व्हायचेच होते …. 
प्रेम तर व्हायचंच होतं…. 

बंद डोळ्यांत स्वप्नं …. 
आणि उघड्या डोळ्यांतून पाणी तरंगायचंच होतं …. 
गर्दीत एक एकट वाटायचंच होतं …. 
हसता हसता चुकून रडायचंच होतं …. 
प्रेम तर व्हायचंच होतं….. 

कोणाच्या तरी आठवणीत संपूर्ण दिवस waste करायचाच होता …. 
कोणाचातरी चेहरा डोळ्यांसमोर ठेऊन …. 
कागदांवर दोन चार lines लिहायच्याच होत्या …. 
कश्यातरी rhyme करून …… 
यासारख्या पोएम्स बनयच्याच होत्या …. 
प्रेम तर व्हायचंच होतं…



Tuesday, September 7, 2010

.... वाट बघता बघता ....

.... वाट बघता बघता ....


तुझी वाट बघता बघता ...
रस्ता तेवढा संपला,
तू तर आलीच नाहीस ...
पण अपघात मात्र घडला...

यायचंच नवथ तुला ...
हे मी समजून घ्यायला हवं होतं,
वेळ नसल्याचा तूझं कारण ...
मला genuine वाटलं होतं... 

तू सोबत असतीस ,
तर मला माझ्याही आधाराची गरज नवथी ,
तू फक्त सोबत असावी ,
एवढीच माझी इच्छा होती ...

मी तुझी वेड्यासारखी वाट पाहत होतो...
हे मला आत्ता पटलं ,
तुला मात्र अजूनही ...
माझं मन नाही कळलं ...

वाट पाहून तुझी ...
मला वाटतं आत्ता काही उपयोग नाही ....
पण या मनाला कोण समजावत बसणार ...
ते माझं ऐकतच नाही ....