Wednesday, July 20, 2011

....प्रेम म्हणजे काय???.....


कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की ...
कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम ...

कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की ...
कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम ....

कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की ...
आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम ...

कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की ...
कोणाच्या सहवासात ... स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम ...

कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की ....
कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम ....

कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की ....
कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम ....

कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की ....
न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम ....

कोणासाठीतरी रडणारं मन म्हणजे प्रेम की ....
कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम ....

कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की ...
कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम ...

कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की ....
आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम की ....

कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम की ....
कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम ....


Sunday, July 17, 2011

मुंबईकरांचं (so called) "Spirit "


       ते म्हणतात कि मुंबईकरांनी पुन्हा त्यांचं spirit दाखवलं ... कितीही bomb blasts  झाले ... अतिरेकी हल्ले झाले ... पूर आला .... दंगली झाल्या ..... तरीही मुंबई कर .. पुन्हा नव्या जोमाने त्यांच्या कामाला लागतात .... त्यांचा spirit दाखवतात ... पुन्हा त्यांची train track वरून धावायला लागते ... कोणालाही न घाबरता ... कोणाला हि न जुमानता ... ते आपापल्या कामाला लागतात .... ते असही म्हणतात .... "यही हैं मुंबईकरो का .... जोश ... उनका जाझ्बा .... जुनून .... "
        Sorry पण मला नाही वाटत कि आपण मुंबईकरांच्या अश्या जगण्याला त्यांचं "Spirit " म्हणावं. मुंबईकरांची हि सगळी उठाठेप ... त्यांची हि नेहमीची वर्दळ .... रोज ची दगदग ... ती कोणाला spirit दाखवायला नाही आहे ..... ती आहे त्यांच्या जगण्यासाठी .... पोट भरण्यासाही .... मुंबई च्या Race मध्ये टिकून राहण्यासाठी .... इथे लोक local trains मध्ये जरी fourth seat वर बसले असतील .... तरी ... जोपर्यंत त्याना जिथे उतरायचा ते station येत नाही तोपर्यंत ... अजिबात seat सोडत नाही .... अरे .... थोडा जरी उठलो आणि तेवढ्या कोणी दुसरा बसला मग .... त्याचं कारण एकच ... इथे प्रत्येकाला त्यांची जागा ... place .... पाहिजे ... आणि असेल तर ती जाऊ नये म्हणून रोज काम करायची त्यांची हरकत नसते .... हेच मुंबईकर .. एवढ्या छोट्या bomb blasts ... अतिरेकी हल्या नंतर .... स्पिरीट दाखवतील .... एवढा सगळं झाला तरी ते स्वताचा routine continue करायच्या मागे असतात .... कारण इथे प्रत्येकाला असंच वाटतं .... जर मी नाही गेलो आज तर ... माझी एक दिवसाची salary कापून घेतील .... ( एकतर आधीच २-३ खाडे झालेत ... ) ... जर मी नाही गेलो आज तर माझ्या जागी कोणा दुसर्याच promotion होईल ... ओर etc . etc . ... etc ... 
            दुख होतं, पण मला नाही वाटत कि मुंबैकाराना तेवढ होत असेल .... त्याना आता तर या सगळ्यांची सवयच झालीये ... 
          त्या रात्री मी bomb blast च्या  news google वर पाहून मी office वरून बस ने घरी जात होतो. तोपर्यंत मला नाही वाटत कि सगळ्याना ती बातमी समजली असेल ...  तर ... हो .... त्या बस चा conductor .. काही passengers ... ना सांगत होता कि मुंबईत 3 blast  झालेत .... तेही अगदी हसत .... मी त्याना एवढंच विचारलं कि .. . "तुम्हाला दुख नाही झालं ... वाईट नाही वाटत ?" ... ते ऐकून conductor ... मला म्हाणाले .. "दुख!! कसलं? अहो आता सवयच होऊन गेलीये .... उलट मला तर आनंदच झालाय ... माझे 4 - 6 passenger कमी झाले .. नाहीतर त्यांच्या बरोबर पण मला सुट्या पैशांसाठी कुस्ती खेळावी लागली असती .. ..
          माझ्या काही FB friends नि त्यांचा dp change केला ... status मध्ये तो incident include केला .... सरकार च्या नावाने बर्याच टीका केल्या ....  पण त्यांच्यातले किती लोक खरोखर दुखी होते? .... 
यालाच आपण आपलं "spirit " म्हणतो ... आपल्याला पाहिजे ... काम ... पैसा ... रोजचं जेवण ( जमलंच तर एखाद्या चांगल्या hotel मध्ये ) .. आणि अजून असेल तर "Happening Life " ...