.... एकटा ....
एकटा आलो मी,
एकटाच चाललो,
एकटा होतो मी,
एकटाच राहिलो...
सगळ्यांसोबत एकटा,
सगळ्यांशिवायही एकटाच,
गर्दीत एकटा मी,
मोकळ्या वाटेतही एकटाच...
एकटा बोलतो मी,
मी ... एकटाच ऐकतो,
कधी हसलो एकटा,
अन बर्याचदा एकटाच रडलो ...
होतो प्रवासात एकटा मी,
Destination ला पोहचलो ...
होतो तिथेही एकटाच,
दिवसाच्या उजेडात एकटा मी,
रात्रीच्या काळोखातही एकटाच ...
विचारांत एकटा,
प्रयत्नांत एकटाच,
हरल्यामुळे मी राहिलो एकटाच,
जिंकलो असतो तर काही काळ ... नसतो मी एकटा....
मित्रांत एकटा मी,
नात्यांत एकटा ...
दोघांतही एकटा मी...
सोबतीही माझा ... मी एकटाच ...
एकटाच घरात मी,
दारातही एकटाच ....
काळजी माझी मला एकट्यालाच,
वाट पाहतो मी एकटाच ...
एकटाच जगलो मी,
एकटाच वाचलो,
.... एकटाच संपलो मी ....
शेवटपर्यंत एकटाच राहिलो ....
apratim!!!
ReplyDelete