Wednesday, November 25, 2009

...... तुझ्या सोबत असताना ......

...... तुझ्या सोबत असताना ......



तुझ्या सोबत असताना ,
Boring Movie असताना ,
Flop Actors असताना ,
even Story सुद्धा पकाऊ असताना ,
फक्त तुझ्या एका Smile ने ...
Ticket चे पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात ....

तुझ्या सोबत असताना ,
Traffic jam असताना ,
पाऊस पडत असताना ,
ट्रेन्स सुद्धा नसताना ,
तुझ्या शिवाय या सर्वांमधलं ...
काहिसुद्धा लक्षात येत नाही ....

तुझ्या सोबत असताना ,
आपल्या दोघंशिवाय अजुन कोणीही नसताना ,
Time लवकर संपतो ,
म्हणून कधी कधी अस वाटत ,
की त्या वेळी पृथ्वी ला बांधून ठेवावं ...
आणि तिचं फिरनं थाम्बवावं ...

तुझ्या सोबत असताना ,
Life मधे कितीही Tension असेल तरी ,
काही क्षण एकदम मस्त वाटतात ,
सगळे problems अगदी ...
विसरल्यासारखे भासतात ...

तुझ्या सोबत असताना ,
Calls receive केले की ,
आपल्या थोड्या वेळाच्या भेटीतला ,
बराच वेळ Waste गेल्यासारखा वाटतो ,
म्हनुनच मी Cell Phone ...
Switch Off करून ठेवतो ...

तुझ्या सोबत असताना ,
आपण दोघे एकत्र असताना ...
कोणी ना कोणी तरी ओळखिचं भेटतच असत ,
म्हनुनच थोड्या वेळासाठी तरी ,
सगळ्या सगळ्यां पासून ...
एकदम अनोळखी व्हावं असं वाटतं ...

तुझ्या सोबत असताना ,
सगळ विसरायला होत ,
तुला काय सांगायच होत ,
आणि तुझ्याशी काय काय बोलायच होत ,
ते सगळं मला ...
तू गेल्यावर आठवत ...

तुझ्या सोबत असताना ,
मला वेळेचं भानच नसत ,
चेहर्या वर Smile असत ,
पण मनातल्या मनात ...
"कुछ कुछ होता हैं " म्हणतात ना ...
तसं काहीतरी होत असत ...







No comments:

Post a Comment