Sunday, May 17, 2009

........यालाच जगणं अस म्हणायच ?.........

..यालाच जगणं अस म्हणायच ?..



दुखाच्या उन्हात घाम गाळायचा ,
रात्री दुखाच्या अंधारातच रडायचे ,
त्यातच एखादी सुखाच्या थंड वार्याची
झुळूक आली
की तिचा फक्त गारवा मनात साठून ठेवायचा ,
पुन्हा दुखाच्या गारव्याने मनाला थंड वाटुन घ्यायच....
यालाच जगणं अस म्हणायच ???

एखाद स्वप्न
बघायचं ,
ते पूर्ण करायला धड्पड़ायचं ,
अशातच स्वप्न तुटल की थोड्स रडायच ,
आणि पुन्हा नविन स्वप्ना मागे धवायाच ,
यालाच जगण अस म्हणायच ???

कोणाच्या तरी प्रेमात पडायच ,
लपून छ्पून भेटायच ,
एकाने रुसायच ... दुसर्याने हसवायच ,
कुठल्यातरी Miss Understanding मुळे वेगळं व्हायच ,
मनात त्याचीच आठवण ठेउन पुन्हा दुसर्या प्रेमाच्या शोधात लागायच ,
यालाच जगण अस म्हणायच ???

लहान असताना आई वडीलांसाठी शिकायच ,
शाळेच्या शेवटी चांगल College भेटावा म्हणुन शिकायच ,
नंतर चांगल Future , Job , Life Partner भेटायला शिकायच ,
लग्ना नंतरही Family साठी , Promotion साठी शिकायच ,
त्यातच आपल्या आणि इतरांच्या अनुभवातून सुद्धा शिकायच ,
यालाच जगण अस म्हणायच ???

हसायच ....., रुसायच .....,
रागवायच ....., रडायच ........,
काही वेळाने सगळं विसरून पुन्हा हसायचं ,
यालाच जगण अस म्हणायच ???

1 comment: