Showing posts with label मैत्री मित्र. Show all posts
Showing posts with label मैत्री मित्र. Show all posts

Tuesday, September 14, 2010

.... एकटा ....

.... एकटा ....


एकटा आलो मी,
एकटाच चाललो,
एकटा होतो मी,
एकटाच राहिलो...

सगळ्यांसोबत एकटा,
सगळ्यांशिवायही एकटाच,
गर्दीत एकटा मी,
मोकळ्या वाटेतही एकटाच...

एकटा बोलतो मी,
मी ... एकटाच ऐकतो,
कधी हसलो एकटा,
अन बर्याचदा एकटाच रडलो ...

होतो प्रवासात एकटा मी,
Destination ला पोहचलो ...
होतो तिथेही एकटाच,
दिवसाच्या उजेडात एकटा मी,
रात्रीच्या काळोखातही एकटाच ...

विचारांत एकटा,
प्रयत्नांत एकटाच,
हरल्यामुळे मी राहिलो एकटाच,
जिंकलो असतो तर काही काळ ... नसतो मी एकटा....

मित्रांत एकटा मी,
नात्यांत एकटा ...
दोघांतही एकटा मी...
सोबतीही माझा ... मी एकटाच ...

 एकटाच घरात मी,
दारातही एकटाच ....
काळजी माझी मला एकट्यालाच,
वाट पाहतो मी एकटाच ...

एकटाच जगलो मी,
एकटाच वाचलो,
.... एकटाच संपलो मी ....
शेवटपर्यंत एकटाच राहिलो ....


Monday, September 6, 2010

.... वाट पाहतोय ....

.... वाट पाहतोय ...

वाट पाहतोय ...
त्या शब्दांची,
शब्दांतल्या त्या गोडव्याची,
न गायलेल्या काव्याची ....

वाट पाहतोय ...
तुझ्या सोबतीची ,
त्या मधुर हास्याची,
त्या बोलक्या नयनांची ...

वाट पाहतोय ...
तू येण्याची,
येऊन माझी होण्याची,
मिठीत माझ्या तू ....
सर्व काही विसरून जाण्याची ....

वाट पाहतोय ...
अवेळी येणार्या पावसाची,
जोराच्या त्या पावसाने ...
तुला भिजून टाकण्याची,
तूझं ओलं सुंदर रूप बघत राहण्याची ...

वाट पाहतोय ...
त्या स्पर्शाची ,
स्पर्शाताल्या त्या जाणीवेची,
माझ्या स्पर्शाने ...
तुझ्या अंगावर येणार्या शहार्याची ...

वाट पाहतोय ...
त्या क्षणाची,
त्या क्षणी असलेल्या एकांताची,
तू आणि मी आपण दोघेच ,
असू  जेव्हा .... त्या वेळेची....

वाट पाहतोय ...
त्या दिवसाची,
तू आणि मी ...
एकत्र होण्याची ...
पाहिलेल्या स्वप्नांना ...
खरोखरचे जगण्याची ....

Friday, July 23, 2010

..... मित्र .....


 ..... मित्र .....



मन मोकळ करायला....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

दुःखा चा  भार हलका करायला ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

सुखा च्या दिवसांत Party करायला ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

एकटेपणा घालवायला .... सोबत ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

स्वतची चूक कबुल करायला ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

मला चुकल्यावर रागावणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

जुन्या आठवणी आणि नवीन स्वप्ने सांगणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

FaceBook च्या Photos मध्ये tag करणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

 Updated status ला comment देणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

twitter च्या twitts ला reply करणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

पावसात स्वतः थोडंसं भिजून ... मला छत्रीत घेणारं ...
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

Surprisingly Movie चा plan करणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

Shopping साठी माझ्या बरोबर अख्खा Mall फिरणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

Exams च्या वेळी लपून लपून Answer दाखवणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

रात्री १२.०० वाजता Birth -Day wish करून party मागणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

मी नसताना माझी आठवण काढणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

मी गेल्यावर माझ्यासाठी मनापासून रडणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

आणि त्या आपलं कोणीतरीचं रूप ...
                 मला तुझ्या चेहर्यात दिसतं ..... 



Sunday, January 10, 2010

...... Collage कट्टा.....

...... Collage कट्टा.....


आमच्या Collage ला कट्टा नव्हता ,
आम्ही Basement मध्येच बसायचो ,
Lectures Bunk करायचो ,
तिथेच कट्टा enjoy करायचो ...

कोणाचीतरी Assignment आणायची ,
आणि सगळ्यांनी मिळून त्याची Handmade Xerox मारायची ,
समजतं तेवढं लिहायच ,
आणि bore झालं की गापची मारायची ...

बसल्या बसल्या मुलींना छेडायचे ,
किंवा नुसती Smileच द्यायची ,
Return मध्ये Smile आली ,
की तिच्याची Friendship करायची ...

मुलींबरोबर बोलणं तसं कमीच व्हायचं ,
कारण दिवसभरातल्या शब्दांचा कोटा Assignment मध्येच संपायचा ,
Professors नेहमी पहायचे ,
कधी ओरडून Lectures ला पाठवायचे ...
कधी तर चक्क हसत हसत जायचे ...

कोणीतरी एखाद्याची Mimicry करायची ,
नाहीतर एखाद्याची fultoo मध्ये खेचायची ,
मग बसल्या बसल्या त्यालाच ...
एखादी diagram काढायला द्यायची ...

कट्ट्यावर एकतरी बकरा नेहमी यायचा ,
जो सगळ्यांसाठी ही Coffee मागवायचा ...
बिच्चारा
Coffee प्रत्येकाच्या टेबल पर्यंत आणून द्यायचा ,
आणि
सगळ्यांचे Coffeeचे bills सुद्धा pay करायचा ...

Fest's च्या गोष्टी करायच्या ,
Lectures ला Official सुट्ट्या घ्यायच्या ,
सगळ्यांनी बसून Scripts वर time-pass करायचा ,
चांगल्या Post साठी settings try करायच्या ...

कट्ट्यावरचे regular days बरे जायचे ,
पण Submission's च्यावेळेला वांदे व्हायचे ,
त्या दिवसांत कट्ट्यावर कोणी rareच दिसायचं ,
पण त्यात काय .... नवीन sem मध्ये सगळे पुन्हा तिथेच यायचे ...

नाही राहिलं College आता ,
नाही राहिला त्याचा कट्टा ,
पण शेवटी त्याला म्हनायचं राहिलं ,
See you again, ... tata...

नाही आता कट्टा तरी ...
आम्ही मित्र एकमेकांना भेटतो ,
तर कधी Facebook वरच chat करतो ,
नाही केला SMS बरेच दिवस तरी ,
Orkut वर एखादातरी Scrap असतो ....





Friday, December 25, 2009

........ आपली Friendship .......

........ आपली Friendship .......


आपलं नातं आता पाहिल्यासारखं नाही राहिलं ,
त्यात नक्कीच बरच काही तरी बदललं ...
आपलं बोलन सुद्धा पहिल्यापेक्षा कमी झालं ,
आणि आज ते फक्त Professional राहिलं ...

आपण एकाच मार्गावर भेटलो ,
थोडा वेळ बोललो ,
Friends बनलो ....
पण त्याचं कारण आपल Destination एकच होतं ...

मला वाटलं आपलं नातं ...
Friendship चं होतं ...
पण ते फक्तं Professional Relation आहे ...
हे माझ्या अत्ता लक्ष्यात आलं ...

मी नेहमीच माझ्या मनातलं ...
बराच काही तुला संगत राहिलो ...
पण तुला ते Boring वाटत असणार ,
हे माझ्या लक्ष्यात नाही आलं ...

आजकाल मला तुझा Call नसतो ...
काही special days ला SMS पण नसतो ...
माझ्या Call ला Reply नसतो ...
Orkut वर Scrap पण नसतो ...

माझ्या Call मुळे तुझा Time waste होतो ...
म्हणून मी Call करत नाही ,
माझ्या SMS मुळे तुला Disturb होतं ...
म्हणून मी तुला SMS तरी कुठे करतो ...

कधी ना कधी हे व्हायचच होतं ...
बरं झालं लवकर झालं ...
नंतर बरच वाईट वाटलं असतं ...
आता थोडक्यातच निभावलं ...

ह्यापुढे Friendship* करताना ...
मन थोडं थांबेल ,
*Terms & Conditions ... Satisfy करून ...
मगच Friends बनवेल ...