.... वाट पाहतोय ...
वाट पाहतोय ...
त्या शब्दांची,
शब्दांतल्या त्या गोडव्याची,
न गायलेल्या काव्याची ....
वाट पाहतोय ...
तुझ्या सोबतीची ,
त्या मधुर हास्याची,
त्या बोलक्या नयनांची ...
वाट पाहतोय ...
तू येण्याची,
येऊन माझी होण्याची,
मिठीत माझ्या तू ....
सर्व काही विसरून जाण्याची ....
वाट पाहतोय ...
अवेळी येणार्या पावसाची,
जोराच्या त्या पावसाने ...
तुला भिजून टाकण्याची,
तूझं ओलं सुंदर रूप बघत राहण्याची ...
वाट पाहतोय ...
त्या स्पर्शाची ,
स्पर्शाताल्या त्या जाणीवेची,
माझ्या स्पर्शाने ...
तुझ्या अंगावर येणार्या शहार्याची ...
वाट पाहतोय ...
त्या क्षणाची,
त्या क्षणी असलेल्या एकांताची,
तू आणि मी आपण दोघेच ,
असू जेव्हा .... त्या वेळेची....
वाट पाहतोय ...
त्या दिवसाची,
तू आणि मी ...
एकत्र होण्याची ...
पाहिलेल्या स्वप्नांना ...
खरोखरचे जगण्याची ....
No comments:
Post a Comment