Monday, September 14, 2009

... थोडा वेळ लागेल ......

... थोडा वेळ लागेल ......


तू नसशील तरीही चालेल ...
थोडे दिवस दुख होइल ,
पुन्हा पहिल्या सारखा हसेल ....
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल ....

तुझ्या सारखं मलाही कोणीतरी भेटेल ,
कोणीतरी माझी आठवण काढेल ,
कोणीतरी माझी वाट पाहिल ...
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल ...

सगळ्याबरोबर असताना आत्ता सारखा मी एकटा नसेल ,
मित्रांमध्ये जमेल ,
Cricket, Football ... Basketball ...खेळू दमेल ...
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल ...

तू मला विसरलीस तसा मी ही तुला विसरेल ,
Past Tense ला सोडून ,
Present Tense मध्ये जगेल ...
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल ...

आत्ता सारखीच भरपूर स्वप्न मला पडतील ,
माझे बरेचसे Friends सुद्धा माझ्या सोबत असतील ...
आणि त्यात तू नसशील ...
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल ...

हिरव्या गार निसर्गाच्या कुशीत मी रमेल ,
रंगन मध्ये रंगेल ,
Adventure Sports सुद्धा Try करेल ...
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल ...

तुझं नाव माझ्या "Friends List" मध्ये नसेल ,
Call आणि SMS तर दुरच ...
पण तुझा Contact Number सुद्धा माझ्या "Phone book" मध्ये नसेल ...
पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल ...

Wednesday, September 2, 2009

...... प्रेम नाही करायच .......

....... प्रेम नाही करायच ......


प्रेम कधी करायचं नसतं ....
जाणून बुजून तरी कशाला लफड्यात पडायचं असतं ....

त्यात अंधारातून चालायचं असतं ....
आणि त्याला
Destination सुद्धा नसतं ...

झोपताना जागायच असतं ...
आणि जागेपनी स्वप्नात झोपायचं असतं ...

Phone वरुण बोलायचं असतं ...
आणि SMS ने Chat करायचं असतं ....

चोरून चोरून ... लपून लपून .... भेटायचं असतं ...
नेहमीच कुठे ना कुठे तरी फिरायचं असतं ...

त्यात Hotels चे Bills pay करावे लागतात ....
विनाकारण Gifts सुद्धा द्यावे लागतात....

पुढे पुढे तर नेहमीच्या मित्राना भेटणं कमी होत ....
घराताल्यांबरोबर सुद्धा बोलणं कमी होत ...

मग अचानक प्रेमातून पडल्याचं समजतं ....
आणि Answers मागे सुद्धा Question mark दिसायला लागतं ...

पुढे पुढे दुखात मन हसणं विसरतं ...
चेहर्यावरच ते कधी कधी थोडसं दिसतं ...

त्या दुखातून बाहेर पडायला ...
मन नवीन प्रेमाच्या शोधात पळायला लागतं ....

आणि ते कोणी भेटलं की ...
"Love cycle" पुन्हा repeat होतं ...

म्हनुनच मी कधी प्रेमाच्या लफड्यात पडलोच नाही ...
मित्रांच्या अनुभवांमुळे अजुन तरी मी त्यापासून लांब राहिलो आहे ...