Showing posts with label पैसा. Show all posts
Showing posts with label पैसा. Show all posts

Saturday, June 20, 2009

..... पैसा .....

........ पैसा .....

पैसा जवळच्या अनेकांना दूर नेतो ,
पण भरपूर दूरच्या अनोळखी लोकांना आपल्या जवळ देखिल आणतो ...

पैसापुस्तक देतो ज्ञान नाही ,
पण नुसतं ज्ञान घेउन काय मिळतं ?

पैशांत स्वप्न विकत घेता येत नाहित ,
पण पैशांशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहित ...

पैसा प्रेम विकत नाही घेऊ शकत नाही .... असं म्हणतात ,
पण पैशांशिवाय तुमच्या प्रेमाला कोणी किंम्मतही देत नाही ...

पैसा भले खरे मित्र देत नाही ,
पण निदान त्यावेळी शत्रु तरी Standard चे असतात ...

पैशांच्या लोभाने मन भरत नाही ,
पण पैशां शिवाय पोट सुद्धा भरत नाही ...

पैसा जरी या जगातल्या सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकत नसला तरी ,
पैशां शिवाय काहीही भेटत नाही ....