Wednesday, August 5, 2009

..... सांग सांग भोलानाथ ..!!! ....

..... सांग सांग भोलानाथ ... !!! ....


लहानपणी भोलानाथाला (नंदिबैलाला ) आपण विचारायचो .... पाऊस पडेल काय ...? आत्ता आपल्याला तो भोलानाथ भेटल्यावर आपण त्याला काय विचारू...? म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं आपण विचारू .... असेच आपल्यातल्या एखाद्याने विचारलेले काही प्रश्न ....


सांग सांग भोलानाथ, ती हो म्हणेल काय ?
माझा हाथ हातात घेउन, मग ती मला मिठीत घेइल काय ?


भोलानाथ दुपारी ती Movie ला येइल काय ?
Advance booking केली नाही, मग Current मधे Corner Seats भेटतील काय ?


भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा ...
संपेल ना रे Recession Period आता ?


भोलानाथ उद्या आहे, KT चा पेपर ...
सोपा जाइल ना रे , मला आता करायचाय तो Clear ?


भोलानाथ भोलानाथ, जॉब मिळेल काय ?
आकाशातून पैशांचा पाऊस पडेल काय ?


भोलानाथ Alladin चा चिराग भेटेल काय ?
भोलानाथ Harry Potter सारखी जादू येइल काय ?



2 comments:

  1. सांग सांग भोलानाथ (गीतकार :मंगेश पाडगांवकर)

    सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
    शाळेभोवती तळे साचून, सुटटी मिळेल काय ?

    भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
    लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

    भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
    आठवडयातनं रविवार, येतील का रे तीनदा

    भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
    पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

    भोलानाथ भोलानाथ चोक्लाते मिळेल काय ?
    आकाशातून वेफर्स्चा पाऊस पडेल काय ?

    भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
    भोलानाथ परिसरखे पंख देशील काय ?

    ReplyDelete
  2. Bholanath Maharashtrat paus padel kay?
    Drushkalala kantalun shetkari atmahatya karil kay?

    Bholanath swine flu cha haidos sampel kay?
    tonda warchya mask cha fayda hoil kay?

    Bholanath 2 mahinyat aahe Vidhansabhecha paper?
    Maharastrasathi MaNaSela vote detil ka re voter?


    Bholanaaaaaaaaaaaaaath Bholanath!

    ReplyDelete